सिंधी कॉलनीत तरूणाला मारहाण करणारा दुसऱ्या संशयितास अटक

जळगाव प्रतिनिधी । जुन्या भांडण्याच्या वादातून तिघांनी शनिवारी मध्यरात्री बेदम मारहाण केल्याची घटना सिंधीकॉलनी परिसरात घडली होती. यातील दुसऱ्या संशयित आरोपीला शहर पोलीसांनी अटक करण्यात आली आहे. विशाल विकास नाईक (वय-३१, रा. प्रभुदेसाई कॉलनी) असे दुसऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, पृथ्वी राजकुमार चंदनानी (वय-२५) रा. चंदूलाल रसवंती जवळ, गणेश कॉलनी हे नामेदव कुळकर्णी यांच्या घरात गेल्या ४ वर्षांपासून भाड्याच्या घरात राहतात. कामाच्या निंमित्ताने त्यांच्याकडे (एमएच १९ बीएल २२०७) दुचाकी असून कामासाठी दुचाकीचा वापर करतात. २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजता नवदुर्गा मित्रमंडळ सिंधी कॉलनी येथे भाविकांसाठी प्रसाद बनविण्याचे काम करत असतांना थोड्यावेळाने ते झोपले. सकाळी ३.४५ वाजता झोपेतून उठल्यानंतर ते सिंधी कॉलनी मंदीरासमोरील हॉटेलजवळ चहा पिण्यासाठी गेले. सौरभ जैसवाल हा तिथे आला आणि गेल्या वर्षी तुला वापरण्यासाठी दिलेला मोबाईल मागितला. मात्र सौरभकडून कोणताही मोबाईल घेतला नाही असे सांगितल्यानंतर सौरभ यांच्यासह विशाला नाईक आणि एक अनोळखी व्यक्तींनी मारहाण करण्यास सुरूवात केली. तर पृथ्वीच्या ताब्यातील दुचाकी आणि मोबाईल असा एकुण ६० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरी हिसकावून घेतला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यापुर्वी सौरभ याला पोलीसांनी अटक केली होती. तर आज सकाळी दुसरा संशयित आरोपी विशाल विकास नाईक (वय-३१, रा. प्रभुदेसाई कॉलनी) याला अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास पोहेकॉ मनोज पवार करीत आहे.

Protected Content