टँकरवर कार आदळली : दोन ठार, दोघे जखमी

भुसावळ प्रतिनिधी | शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने धावणारी कार टँकरवर आदळल्याने झालेल्या अपघातात आजी व नातचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.

या संदर्भात वृत्त असे की, छत्तीसगडची राजधानी असणार्‍या रायपूर येथून दीपकसिंग अहलुुवालिया हे सीजी.०४-डीएफ.५०४७ या क्रमांकाच्या होंडासिटी कारने त्यांची पत्नी गुंजन, दीड वर्षाची मुलगी बानी व आई सुजिंदरकौर यांना घेऊन कल्याणला निघाले होते. भुसावळात खडका चौफुलीवर कारचे चालकाकडील बाजूचे मागील टायर फुटले. यामुळे कार महामार्गावर उभ्या असलेल्या टँकरवर आदळली. हा अपघात काल सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडला.

या अपघातात सुजिंदरकौर अहलुवालिया आणि मुलगी बानी यांचा मृत्यू झाला. स्वत: दीपकसिंग व त्यांच्या पत्नी गुंजन जखमी झाल्या. दरम्यान, अपघातानंतर दोन्ही जखमी महिलांना रूग्णवाहिकेतून डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय नेण्यात आले. या संदर्भात रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!