शेतातील उभ्या जेसीबीमधून डिझेल चोरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ रोडवरील गोदावरी हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या शेतामध्ये उभ्या जेसीबीमधून २० लीटर डिझेल लांबवून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नशीराबाद पोलिसात दोन भावडांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, गोदावरील हॉस्पिटलच्या मागील बाजूस शेतामध्ये एम.एच. १९ सी.व्ही. २१०४ या क्रमांकाचे जेसीबी वाहन उभे होते. २५ मार्च रोजी सायंकाळी या जेसीबीमधून अजय कोळी व त्याचा भाऊ मनोज कोळी दोन्ही रा. जोगलखेडा ता भुसावळ यांनी नळी टाकून २० लीटर १ हजार ९११ रुपयांचे डिझेल चोरुन नेत होते. घटनेची माहिती मिळाल्यावर नरेंद्र पितांबर भिरुड यांच्यासह काही जणांनी घटनास्थळ गाठले. दोघेही डिझेल चोरतांना दिसून आले. दोघांना काय करताहेत अशी विचारणा केली असता, दोघेही पळून गेले. अशी तक्रार नरेंद्र पितांबर भिरुड वय ५२ यांनी यांनी नशीराबाद पोलिसात दिली असून त्यावरुन अजय कोळी व मनोज कोळी या दोघा भावंडाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!