Home क्राईम भडगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना! फुलावरून पडलेल्या युवकाचा अद्याप शोध नाही; नागरिकांना माहिती...

भडगाव तालुक्यातील दुर्दैवी घटना! फुलावरून पडलेल्या युवकाचा अद्याप शोध नाही; नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन

0
113

भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील पांढरद गावातील एका युवकाचा फुलावरून पडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, संबंधित यंत्रणा आणि ग्रामस्थांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. मात्र, शनिवारी (१ ऑगस्ट) दुपारपर्यंतही युवकाचा शोध लागलेला नसल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. ३१ जुलै रोजी सायंकाळी सुमारे ७:२५ वाजण्याच्या सुमारास पांढरद येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र भिल (वय ३५) हे फुलावरून पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, संबंधित यंत्रणा आणि ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरू केले. नदीपात्र व परिसरात विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात येत असून अद्याप त्यांचा शोध लागलेला नाही.  प्रवीण भिल यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी आणि एक मुलगी असा परिवार असून, या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावातही हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांकडून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली जात आहे.

शोधकार्य अधिक प्रभावी करण्यासाठी प्रशासनाने नागरिकांनाही सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रवीण राजेंद्र भिल यांच्याबाबत कोणालाही कोणतीही माहिती मिळाल्यास किंवा ते कुठेही आढळल्यास तात्काळ ९९७५८३३८३९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू असून, युवकाचा लवकरात लवकर शोध लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीच स्वीकारावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound