नेहरूंना कुठलेही आरक्षण पसंत नव्हते – पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राज्यसभेत बोलतान विरोधी पक्ष काँग्रेसवर घणाघाती टीका केल्याचे पाहायला मिळाले. आरक्षणाच्या मुद्द्यावर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एका पत्राचे वाचन करत मोदींनी काँग्रेस जन्मजात आरक्षणाच्या विरोधात असल्याचा आरोप केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर आपल्याला २१ शतकात आपल्याला विकसीत भारताचे स्वप्न साकार करायचे असेल तर २०व्या शतकातील विचार चालणार नाहीत. २०व्या शतकातील स्वार्थी अजेंडा देशाला विकसीत करु शकत नाही.

काँग्रेसकडून जातीबद्दल बऱ्याच गोष्टी बोलत आहे. त्यांना जातीविषयी बोलायचे असेल तर त्यांनी स्वतःकडे एकदा पाहावे, त्यांनी स्वतः काय केले आहे ते कळेल. दलित, मागास आणि आदिवासी यांची काँग्रेस जन्मजात विरोधक आहे. मला कधी तरी वाटतं बाबासाहेब नसते तर एससी एसटींना आरक्षण मिळालं असतं की नसतं हा प्रश्न देखील मला पडतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

यांचे विचार आत्ताच नव्हे तर आधीपासूनच तसे आहेत माझ्याकडे त्याचा पुरावा देखील आहे. एकदा नेहरूंनी एक पत्र मुख्यमंत्र्यांना लिहीलं होतं. मी त्या पत्राचा अनुवाद वाचत आहे. मला कुठल्याही प्रकारचे आरक्षण पसंत नाही, विशेषतः नोकऱ्यांमधील आरक्षण तर कधीच नाही. मी अशा कुठल्याही निर्णयाच्या विरोधात आहे जो अकुशलतेच्या वाढीस चालना देईल. जो दुय्यम दर्जाकडे घेऊन जाईल. ही पंडीत नेहरूंनी देशातील मुख्यमंत्र्यांनी लिहीलेलं पत्र आहे. त्यामुळे हे जन्मजात आरक्षणाच्या विरोधी आहेत असं मी म्हणतो असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

Protected Content