औरंगजेबाची सेना झाली आहे का?- नवनीत राणा

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राणा दाम्पत्यावर टीका केली. यावर खा. नवनीत राणा यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत हनुमान चालिसा म्हणण्यावरून एका महिलेला तुमचे सरकार राजद्रोहाखाली अटक करते, पण औरंगजेबाच्या कबरीवर फूल वाहणाऱ्यांवर एक चकार शब्द नाही, यावरून तुमची औरंगजेबाची सेना झाली आहे का? असे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.

शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाची मुख्यमंत्री ठाकरे यांनी वांद्रे-कुर्ला संकुलात सभा घेतली. यात मुख्यमंत्री ठाकरेनी भाजपाच्या हिंदुत्व,त्याच्या यंत्रणांचा गैरवापर, किरीट सोमय्यां आणि मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला आलेले पळून गेले अशा शब्दात राणा दाम्पत्यावर टीका केली.

यावर मी काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालिसा पठण करू शकते तर महाराष्ट्रात का नाही? पुरुष महिलेपेक्षा जास्त शक्तिशाली असून तुम्ही तुमच्या शक्तीचा गैरवापर केला. जेव्हा सत्ता परिवर्तन होऊन तुमच्या घरातील महिला तुरुंगात जाईल. तेव्हा कोणताही गुन्हा न करता तुरुंगात टाकल्याच्या दुःख काय असते हे मी विचारणार आहे.

तसेच मुख्यमंत्र्यांनी गदा हातात न घेताच शॉक लागल्यासारखे करीत गदेचा अपमान केला. यासभेवेळी शेतकरी, बेरोजगारी, लोडशेडिंग, शेती सिंचन प्रश्नसंदर्भात काहीच न बोलता फक्त दुसऱ्यांवर टीका करण्यासाठीची सभा असल्याचे नवनीत राणा यांनी यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!