राज्यात योग आयोग स्थापन करण्याची मागणी; महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्यात योग स्थापन करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या हित संबंधाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात योग स्थापन व्हावा यासाठीची प्रमुख मागणी आहे. गुजरात, हरियाणा व राजस्थान या राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील योग आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी नागपूर येथे पार पडलेल्या महायोगात्सव समारंभात महाराष्ट्रात योगायोग स्थापन झाला पाहिजे असा ठराव एक मताने पारित करण्यात आला आहे.

या आहेत प्रमुख मागण्या
महाराष्ट्रात योग आयोग स्थापन करावा, एमपीएससी परीक्षेत योग विषयाला ऐच्छिक विषय म्हणून मान्यता द्यावी, शाळा व महाविद्यालयात योग विषयास प्रमुख विषय म्हणून मान्यता द्यावी, आरोग्यवर्धिनी केंद्रात सेवा देणारे योगशिक्षक यांना नियमित करावे, शासकीय व नियम शासकीय आस्थापनामध्ये योगा ब्रेक नियमित करावा व त्या ठिकाणी एक तज्ञ योगशिक्षक नेमवा, योग विषयात सेट परीक्षेत सामील करावे, महाराष्ट्र पोलीस खात्यात योगशिक्षक नियमित करावा, ग्रामीण आणि शहरी भागात २० वर्षांपासून निशुल्क सेवा देणाऱ्या योगशिक्षकात लोक कलवंतांप्रमाणे मानधन देण्यात यावे, यासह इतर मागण्यांच्या समावेश करण्यात आला आहे.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील गुरव, उपाध्यक्ष ॲड. स्वाती निकम, सुभाष जाखेटे, पांडुरंग सोनार, शिला रावत, नूतन जोशी, जयश्री रोटे, पल्लवी उपासनी, निशिता रंगलानी, वैशाली भारंबे, सोनाली पाटील, प्रांजली आंबेडकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

Protected Content