जळगाव प्रतिनिधी । अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचे तालुक्यातील धानवड गावात पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले तर काही महिलांनी ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत केले.
तालुक्यातील धानवड येथे आज १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता भाजपाचे अधिकृत बंडखोर अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा धानवड येथे प्रचार दौरा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी गावातील महिलांनी चंद्रशेखर अत्तरदे व माधुरीताई अत्तरदे यांचे फुलहार घालून स्वागत केले. सदर प्रसंगी चंद्रशेखर अत्तरदे यांच्यासारखा शेतकऱ्यांमधील नेता हवा, असा सूर यावेळी गटामधून उमटला.
यांची होती उपस्थिती
सदरप्रसंगी प्रकाश बारी, रघुनाथ चव्हाण, शरद पाटील, जयवंतराव अमृतराव पाटील, शशांक पाटील, विजय परदेशी, संजय भोळे, गणेश पाटील, प्रकाश बारी, सुदाम राजपूत, अरुण सपकाळे, मिलिंद चौधरी, अरुण बर्हाटे, ईश्वर मराठे, मनोज इंगळे, दीपक ढाके, नकुल चौधरी, दिगंबर खाचणे, सुनिल अत्तरदे, धानवड गावचे सरपंच, ग्रा. प. सदस्य, बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, पन्ना प्रमुख तसेच पदाधिकारी व ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. राकेश नन्नवरे (सरपंच, बांभोरी तथा तालुका सरचिटणीस, भाजपा युवा मोर्चा), निर्दोष पाटील (सरपंच, सोनवद) यांच्यासह असंख्य भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.