Home राजकीय आमदारांना ५० कोटी पर्यंतची ऑफर ; कॉंग्रेसचा भाजपवर खळबळजनक आरोप

आमदारांना ५० कोटी पर्यंतची ऑफर ; कॉंग्रेसचा भाजपवर खळबळजनक आरोप

0
102

 

vijay 1561372980

मुंबई (वृत्तसंस्था) कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह शिवसेनेच्या आमदारांना २५ ते ५० कोटी पर्यंतची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप कॉंग्रेसचे नेते विजय वड्डेटीवार यांनी भाजपावर लावला आहे.

 

वड्डेटीवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, आमचे कोणतेही आमदार फुटून जाणार नाहीत. मात्र, फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. जर कोणाचे फोन आले तर ते रेकॉर्ड करा. आपण पुरावे गोळा करु आणि त्यांना तोंडावर पाडू, असेही आम्ही आमच्या आमदारांना सांगितले आहे. राष्ट्रपती राजवटी लागू झाल्यास त्याला भाजपाच जबाबदार असेल असा आरोप वड्डेटीवार यांनी भाजपावर केला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री ठरला असेल तर द्यायला हवा. नसेल तर तसे सांगायला हवे असेही ते म्हणाले.


Protected Content

Play sound