दुष्काळ निवारण्यासाठी प्रसंगी तीव्र आंदोलन – रविंद्रभैय्या पाटील (व्हिडीओ)

NCP press

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात टंचाईला सामोरे जाण्याची गावांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून पिण्याचे पाणी, गुरांना चारा आणि कर्जमाफी याबाबत शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा तिव्र आंदोलन करणार असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविद्रभैय्या पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, मंगला पाटील, ममता तडवी, सविता बोरसे, मिनाक्षी चव्हाण, पिनाज फनीबंदा, निला चौधरी, परेश कोल्हे आदी उपस्थित होते.

जळगाव जिल्ह्यात पाण्याची टंचाई अधिक वाढली आहे. दिवसेंदिवस पाणीटंचाई गावाची संख्या वाढत आहे. राज्य शासनाने दुष्काळग्रस्त गावांना 24 तासात पाण्याचे टॅकर उपलब्ध करून द्यावेत आणि गुरांसाठी पिण्याचे पाण्याचेही टॅकर वेगळे उपलब्ध करून द्यावेत. पिण्याच्या पाण्याचे टॅकर देतांना टिसेल पावडर टाकूनचे दिले जावे, आज अशुध्द पाणी मोठ्याप्रमाणावर वापरले जात आहे. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्हयात जामनेर 34, पाचोरा 18, चाळीसगाव 39, पारोळा 24 अशी कमी अधिक प्रमाणात पाणीपुरवठयासाठी टँकर आहेत.

राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने तालुका आणि जिल्हास्तरीय ठिकाणी विविध मागण्याचे निवेदनही यापुर्वी दिली गेली आहे. कर्जमाफीचा घोळ अद्याप कायम आहे. अजूनही काही शेतकरी कर्जमाफीपासून वंचित अजूनही आहे. त्यांना न्याय मिळावा, पिण्याचे पाणी, गुरांना चारा या समस्या येत्या 15 दिवसांत समस्या सोडविले नाही तर राज्य सरकारला मोठ्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शासनाने या प्रश्नांकडे गांर्भीयाने लक्ष देवून तातडीने नियोजन करावे. 7/12 उतारा तलाठ्यांमुळे मिळत नाही, अश्या ठिकाणी तलाठ्यांची भरती कारावी, शेती पिकसाठी पालकमंत्र्यांनी तालुकास्तरीय बैठक घ्याव्यात. विंध्यन विहिरीची संख्या वाढवावी, दुष्काळी परिस्थिती अधिक असल्याने विद्यार्थ्यांची शाळेची फि माफ करावी, खतांच्या किंमती कमी कराव्यात. जुनच्या पहिल्या आठवडयात पाऊस न झाल्यास चारा टंचाईला सामोरे जावे लागेल. खरिपाचा हंगाम 5 लाख हेक्टरा खाली असतो. रब्बी पीक 1. 75 लाख हेक्टरवर घेतले जाईल अशी अपेक्षा होती. रब्बी पीक 90 हजार हेक्टर वर झाले. भविष्यकाळात टँकरची संख्या वाढवावी लागणार आहे. तालुकास्तरावर टंचाई विभाग निर्माण करुन गरज पडल्यास गावात 24 तासात टँकर गेला पाहिजे अशी व्यवस्था करावी.

दुष्काळ परिषदेचे होणार आयोजन
जिल्हासह राज्यात मोठ्या प्रमाणावर दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून येत्या दोन ते तीन दिवसात दुष्काळी परीषदेचे आयोजनही करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार, खासदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थित होते.

Add Comment

Protected Content