चुंचाळे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात

यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील चुंचाळे गावात भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या फलक अनावरणासह ग्रंथालयाचा शुभारंभ व कोरोना योद्धाचा सन्मान अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन शाखेच्या वतीने रविवार रोजी करण्यात आले.

तालुक्यातील चुंचाळे येथे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाच्या वतीने शाखेचे फलक अनावरण, ग्रंथालयाचा शुभारंभ व कोरोना योद्धाचा सन्मान अश्या विविध कार्यक्रमाचे आयोजन रविवार रोजी करण्यात आले. यावेळी सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कैलास वनलाल लोहार, सैनिक चुंचाळे महेन्द्र पुंडलीक पाटील व सैनिक विरावली यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रमुख पाहूणे म्हणून सेवानिवृत्त सैनिक महेंन्द्र पाटील उपस्थित होते. दरम्यान माझा सत्कार हा चुंचाळे गावाचा सत्कार असून मला माझ्या गावानेच घडवले असल्याचे सैनिक कैलास लोहार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष सुनिल बाळकृष्ण नेवे, लोकनियुक्त सरपंच सुनंदा संजय पाटील, किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष विजयकुमार पाटील, वढोदा सरपंच संदीप प्रभाकर सोनवणे, युवा सेना तालुका अध्यक्ष प्रविण तुकाराम सोनवणे, शे.युनूस शे.शफी मंन्सुरी संचालक मेष अँग्रो एजंन्सीज साकळी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हासरचिटणीस विनोद लिलाधर पाटील, डांभुर्णी येथील स्वयंदीप प्रतिष्ठानचे संचालक संदीप निंबाजी पाटील ,तेजस धनंजय पाटील, जिल्हाअध्यक्ष स्टुडंन्स आँलंम्पिक असोसिएशन जळगाव निलीमा चंन्द्रकांत नेवे, ग्रा.प.सदस्य साकळी किनगाव प्राथमिक आरोग्य केंन्द्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन, साकळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.स्वाती कवडीवाले, सामाजीक कार्येकर्ते मिलींद जंजाळे, पत्रकार डी.बी.पाटील, के.बी.खान, सुनिल गावडे आदी उपस्थीत होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून करण्यात आली. तसेच भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघांच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. व सैनिक जवान आणी कोरोणा योद्धा यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. यावेळी स्वयंदीप प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा संदीप पाटील व किनगाव इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कुलचे सचिव मनिष पाटील यांनी ग्रंथालयासाठी शैक्षणीक व सामाजीक पुस्तीका मुबलक प्रमाणात देऊ असे सांगत आपले मनोगत व्यक्त केले. तर तेजस पाटील यांनी ग्रंथालयाबाबत माहीती दिली. किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय आधीकारी डाँ.मनिषा महाजन यांनी आरोग्यसेवेबाबत माहीती देत जास्तीत जास्त लसिकरण होण्यासाठी आरोग्य विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. कार्येक्रमाचे उदघाटक महेंन्द पाटील (बिएसएफ जवान) विरावली यांनी सैन्यभरतीसाठी गावातुन तरूणांनी तयारी करावी व नियमीत व्यायामासह आभ्यासही करावा व त्यासाठी आपण सर्वोतोपरी मदत करू असे महेंन्द्र पाटील यांनी सांगीतले. प्रास्ताविक पत्रकार बाबुलाल पाटीलसर तर सुत्र संचालन व आभार प्रदर्शन महेश पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश चौधरी,लतीब तडवी,दिपक नेवे,विक्की वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

Protected Content