बालाजी संस्थांनकडून स्तंभ अन मंडप पूजन

parola pujan

पारोळा, प्रतिनिधी | बालाजी संस्थानकडून साजरा होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची सुरुवात आज सकाळी स्तंभ पूजनाने करण्यात आली. संस्थानचे मुख्य विश्वस्त श्रीकांत शिंपी यांच्या हस्ते सकाळी ६.०० वाजता हे पूजन करण्यात आले.

 

संजय पाठक यांनी ही पूजा मांडली होती. या वेळी संस्थानाचे कार्याध्यक्ष रावसाहेब भोसले, विश्वस्त डॉ. अनिल गुजराथी, डॉ नंदू सौदनी, प्रकाश शिंपी, संजय कासार, दिनेश गुजराथी, केशव क्षत्रिय, अरुण वाणी, चंद्रकांत शिंपी, दिलीप शिरूडकर, प्रमोद शिरोळे, बापू कुंभार, बापू शिंपी, राजेंद्र चौधरी, डी.डी. वाणी, सुनील शिंपी, आदी जण उपस्थित होते.

यावेळी बालाजी संस्थानकडून साजरा होणाऱ्या ब्रह्मोत्सवात वहन व रथोत्सव मिरवणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी प्रभू बालाजी महारांजाना साकडे घातले जाते. तसेच वर्षभर सर्व तालुकावासियांवर संकट येऊ नये, म्हणून कृपादृष्टी असू देण्यासाठी व स्तंभपूजन करून या उत्सवाची सुरुवात केली जाते.
या कार्यक्रमासाठी रमेश शिंपी, कृष्ण बारी, अमोल भावसार, राजू शिंपी, अरुण लोहार, यांनी परिश्रम घेतले.

Protected Content