जळगावात बस चालकाला विद्यार्थ्याकडून मारहाण

crime 4 3

जळगाव प्रतिनिधी । भादली ते जळगाव येणाऱ्या बस चालकाला विद्यार्थ्याने मारहाण केल्याचा प्रकार शिवाजी पुतळ्याजवळ दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत माहिती अशी की, भादली ते जळगाव जाणाऱ्या बस क्रमांक (एमएच 20 बी 8618 ) वरील बसचालक ललित तुकाराम गायकवाड रा. सिध्दी विनायक कॉलनी, जिल्हा पेठ हे बस भादलीहून जळगावला दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडून बस जात असतांना एका विद्यार्थ्यांने दुकाची बस समोर लावून काहीही कारण नसतांना चालकास शिवीगाळ व मारहाण केली. याप्रकरणी चालक ललित गायकवाड यांनी जिल्हा पेठ पोलीसात विद्यार्थ्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

Protected Content