हरताळे येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर उत्साहात

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित, श्रीमती जी.जी.खडसे महाविद्यालयतर्फे राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिर हरताळे येथे नुकतेच आयोजित करण्यात आले होते.

शैक्षणिक वर्ष 2021-22 एन. एस. एस. विशेष हिवाळी शिबिर ” भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” या विषयावर आधारलेले आहे.

दि. 21 फेब्रुवारी रोजी शिबिराचा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन मनोहर जगन्नाथ काळे (माजी सैनिक) यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ईश्वरभाऊ शंकर रहाणे उपस्थित होते. मनोहर काळे यांनी उद्घाटनपर भाषणात देशाच्या स्वातंत्र्यासाठी हुतात्म्यांनी देशाच्या इंच-इंच भूमी साठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेले आहे. हे बलिदान प्रत्येक भारतीयांनी पावलोपावली स्मरणात ठेवले पाहिजे असा संदेश दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणात ईश्वरभाऊ रहाणे यांनी शिबिराच्या सात दिवसीय कार्यक्रमात गावातील प्रत्येक नागरिकांचा सहभाग असेल यामध्ये ग्रामपंचायत, विकास सोसायटी, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच विविध स्वयंसेवी संस्था सहभागी होतील असे आश्वासन दिले. आमच्या गावात राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन होत आहे, त्याबद्दल त्यांनी गावकऱ्यांच्या वतीने आभार सुद्धा व्यक्त केले. उदघाााा

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.दीपक बावस्कर, प्रास्ताविक प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर आभार प्रदर्शन प्रा.विजय डांगे यांनी केले. बौद्धिक सत्राचे पहिले व्याख्याते महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर उद्बोधन केले. यामध्ये विद्यार्थ्याच्या मनात त्यागाची, श्रमाची, न्यायाची, प्रेमाची आणि मूल्यांच्या भावनेची ज्योत निर्माण केली. सायंकाळी पाच वाजता एन एस एस चे जिल्हा समन्वयक प्रा. डॉ मनिष कारंजे यांनी फोन द्वारे संपर्क करुन शिबिर सप्ताहास शुभेच्छा देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

दि. 22 फेब्रुवारी रोजी श्रमदान सत्रात शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला. तसेच वृक्षारोपण करिता खड्ड्यांचे खोदकाम केले. दुपारच्या बौद्धिक सत्रात प्रा. ताहिरा मिर यांनी दैनंदिन जीवनात इलेक्ट्रॉनिक्स महत्व तर प्रा. डी. आर. कोळी यांनी एनएसएस आणि विद्यार्थी आणि प्रा. डॉ. सी जे.पाटील यांनी अंधश्रद्धा शास्त्रीय विवेचन या विषयावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.

दि. 23 फेब्रुवारी रोजी श्रमदानाच्या सत्रात स्त्री-पुरुष समानता यामध्ये बेटी बचाव- बेटी पढाव चा आणि व्यसनमुक्तीच्या संदेशाचा नारा देत जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठ्या तलावाच्या काठी वसलेल्या श्री साई मंदिर परिसराची स्वच्छता करून ग्रामस्वच्छतेचा संदेश दिला. डॉ. प्रियंका वाणी (उपजिल्हा रुग्णालय, ममुक्ताईनगर) त्यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चौकशी करून काही प्राथमिक उपचाराचे साहित्य देऊन मार्गदर्शन केले. बौद्धिक सत्रात पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र तायडे यांनी रस्ते अपघात आणि सुरक्षा तर प्रा. डॉ. थोरात यांनी रक्त-जीवन संजीवनी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. डॉ. आर. टी.चौधरी व प्रा. डॉ. सुरेखा चाटे यांनी प्राणिशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने रक्तगट तपासणी शिबिर यशस्वीरीत्या पूर्ण केले.

दि.24 फेब्रुवारी रोजी श्रमदान सत्रात लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी छोटे कुटुंब सुखी कुटुंब असा नारा देत भवानी माता मंदिर परिसर आणि श्री चक्रधर स्वामी मंदिर परिसराची साफसफाई केली. बौद्धिक सत्रात डॉ. शुभम दिगंबर खर्चे (खर्चे रुग्णालय, मुक्ताईनगर) यांनी आरोग्यम् धनसंपदा या विषयावर मार्गदर्शन करुन विदयार्थ्यांची व गावकऱ्यांची आरोग्य तपासणी केली. महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. सौ छाया खर्चे यांनी वि.स. खांडेकर लिखित ‘आत्महत्या’ या विषयावर कथाकथन सादरीकरण केले. तसेच प्रा. संजीव साळवे यांनी अंधश्रद्धा समज-गैरसमज विषयावर गीत गायन करुन मंत्रमुग्ध केले.

दि. 25 फेब्रुवारी रोजी श्रमदान सत्रात आरोग्य विषयक जनजागृती करून प्राथमिक आरोग्य केंद्राची साफसफाई केली. बौद्धिक सत्रात पाचपांडे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व स्माईलिंग स्टोन फाउंडेशन मुक्ताईनगर यांनी प्रात्यक्षिकासह आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिर यशस्वीरित्या पूर्ण केले.

दि. 26 फेब्रुवारी रोजी श्रमदान सत्रात मतदार जनजागृती निमित्त माझे मत- माझे भविष्य असा जयघोष करत ग्रामपंचायत व विकास सोसायटी कार्यालयाला भेट दिली. हरताळे वनोउदयान पर्यटन प्रकल्पास भेट दिली असता पर्यावरण संवर्धनाची जाणीव गावकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वन अधिकारी व कर्मचारी वर्गाने करून दिली. वनोउदयानात विदयार्थ्यांनी अतिशय मनमुरादपणे आंनद घेत वृक्ष संवर्धन आणि संधारणाची शपथ घेतली.

मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी यांनी विद्यार्थी वनोउदयानात श्रमदान करीत असलेल्या ठिकाणी सदिच्छा भेट देत ‘शिबिराचा अनुभव तुम्हाला जीवन जगायला शिकवेल’ असा भावात्मक उपदेश विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शनपर दिला.

बौद्धिक सत्रात प्रा. खडसे व प्रा. श्रावगे यांनी वित्तीय साक्षरता उद्बोधन आणि प्रशिक्षण सादर केले. दुपारी चार वाजता कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील राष्ट्रीय सेवा विभागाचे संचालक प्रा. डॉ. सचिन नांद्रे यांनी फोन द्वारे शिबिरार्थी विद्यार्थी व कार्यक्रम अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शिबिरास शुभेच्छा दिल्या. सायंकाळी ठीक साडेपाच वाजता महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी शिबिराला सदिच्छा भेट देत “पानी मे आग लगा देंगे…हम हारेंगे नही..हम जित लेंगे…हम सब कुछ कर देंगे…!” हा संदेश युवा पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून दिला. त्याचबरोबर विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य मिळवताना ते सर्वोत्तम असले पाहिजे, म्हणजेच ‘डीएम नही…तो सीएम बनो’ असे बोधात्मक आवाहन केले. एन एस एस चे रावेर विभागीय समन्वयक प्रा. डॉ. वरडीकर (भालोद महाविद्यालय) यांनी शिबिरास सायंकाळी सहा वाजता भेट देऊन विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.

दि. 27 फेब्रुवारी रोजी श्रमदान सत्रात शाळेच्या आतील व बाहेरील बाजूचा संपूर्ण परिसर स्वच्छ करून रांगोळीच्या सजावटीने आकर्षक केला. तसेच झाडांना योग्य प्रकारे आळी करुन पाणी दिले. अॅड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राजू इब्राहिम तडवी (शिक्षण विस्तार अधिकारी) तसेच आनंदराव देशमुख व ईश्वरभाऊ रहाणे यांच्या उपस्थितीत शिबिराचा समारोप कार्यक्रम संपन्न झाला. समारोपाच्या कार्यक्रमात शितल भोई, प्रफुल यमनेरे, ऋत्विक बढे व प्रतिमा मोरे या विद्यार्थ्यानी शिबिरांमध्ये सात दिवसात आलेले अनुभव कथन केले. ईश्वर रहाणे यांनी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत गावकऱ्यांच्या वतीने येणाऱ्या प्रत्येक शिबिरासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे ग्वाही दिली.

तसेच आनंदराव देशमुख यांनी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त आणि स्वावलंबी शिक्षणाचे धडे मिळतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात हरताळे गावात संपन्न झालेल्या शिबिराचा अनमोल ठेवा कायमस्वरूपी पाठीशी ठेवावा असा संदेश दिला.

शिक्षण विस्तार अधिकारी राजू तडवी यांनी समारोप प्रसंगी विद्यार्थी हा शिबिरामध्ये बलवान, धैर्यवान, शीलवान आणि बुद्धिमान बनत असतो त्यासाठी शिबिरात सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात रोहिणीताई खडसे-खेवलकर यांनी युवा पिढीने कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनाच्या नांदीसाठी एकत्र येऊन संघर्षावर विजय मिळवला पाहिजे, म्हणजेच “कुटुंब सुखी तर समाज सुखी…समाज सुखी तर राष्ट्र सुखी…यासाठी मेणबत्तीरूपी आयुष्य जगा…!” असा भावनिक सल्ला देत मनोगत व्यक्त केले.

याप्रसंगी शिबिर यशस्वी केल्याबद्दल प्रभारी प्राचार्य डॉ.महाजन तसेच कार्यक्रमाधिकारी प्रा. विजय डांगे प्रा. डॉ.दीपक बावस्कर आणि प्रा. डॉ. छाया ठिंगळे यांचा सन्मान रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते संपन्न झाला. या शिबिराच्या सप्ताह मध्ये महाविद्यालयातील आणि गावातील बऱ्याच मान्यवर मंडळींनी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी शिबिराला सदिच्छा भेटी दिल्या.

यामध्ये महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य अनिल पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. पितांबर लढे, प्रा.संजय पाटील प्रा डॉ. अतुल बडे, प्रा. राजन खेडकर, प्रा. डॉ.शालिग्राम चव्हाण, प्रा. डॉ. प्रेमसागर, प्रा.दत्तात्रय कोळी, प्रा.चव्हाण, प्रा.गवळी, प्रा. पंडित चौधरी, प्रा. डॉ.गायकवाड, प्रा. विनोद महाजन, प्रा. डॉ. नेहते प्रा.डॉ.येवले, प्रा. डॉ. वाकोडे प्रा.हुसे, प्रा.डॉ.किनगे, प्रा. डॉ. तुकाराम पाटील, प्रा.इंगळे प्राणिशास्त्र विभागातील रक्तगट तपासणी साठीचे विद्यार्थी तसेच योग शिक्षिका म्हणून प्रा. डॉ.प्रतिभा ढाके यांचे अनमोल सहकार्य लाभले. उद्घाटनच्या आणि समारंभाच्या कार्यक्रमाला हरताळा गावातील विविध मान्यवर उपस्थित होते, तसेच काही मंडळीनी सदिच्छा भेटी दिल्या.

यामध्ये गावचे सरपंच प्रकाश कोळी, उपसरपंच नामदेवराव भड, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा चौधरी व इतर शिक्षक वर्ग, उर्दू शाळेचे मुख्याध्यापक शेख अश्पाक शेख रज्जाक व शिक्षक वर्ग, पोलीस पाटील स्नेहल प्रदीप काळे, समाधान कार्ले, निवृत्ती भड, प्रा. सिताराम चवरे, के. एन. पाटील सर, शेख रहेमान शेख उस्मान, चंद्रकांत कार्ले, गोपाळभाऊ उधळकर, जयेश कार्ले, पंढरीनाथ मुलांडे, अशोक चौधरी,भागवत धबाडे, बाळू पाटील, हमीद पठाण, तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रवीण सपकाळ, मंडप डेकोरेट कैलास सपकाळ, सोपान दांडगे, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रदीप काळे, रविंद्र आत्‍माराम टोंगळे, आणि निलेश संतोष काळे, वाजीद शेख, तसेच ग्रामपंचायत कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे व श्रीसाई फाऊंडेशनचे अनमोल सहकार्य लाभले. याचबरोबर वनोउद्यान अधिकारी व समितीने उद्यानास भेट देण्याची परवानगी देऊन आम्हास उपकृत केले. तसेच ग्रामपंचायतचे आजी-माजी सर्व सदस्य व विकास सोसायटीचे सर्व आजी-माजी संचालक तसेच गावकऱ्यांनी सदिच्छा भेटी देऊन आमचे मनोबल वाढवले होते.

एन. एस. एस. विशेष हिवाळी शिबिरामध्ये कुणाल भारंबे, कमलेश जावरे, शुभम गायकवाड, निखिल रायपुरे, ऋषिकेश वानखेडे, उत्तम चव्हाण, भूषण पाटील, चेतन मोरे, किरण माळी, देवेंद्र धांडे, कृष्णा पाटील, पोहेकर, तेजस सरोदे, अश्विन गायकवाड, निर्मल पाटील, विशाल दुट्टे, ज्ञानेश्वर पाटील, संदेश दुट्टे, योगेश वराडे, निखिल भोजणे, चंदन, रेणुका काकडे, नेहा राणे, गायत्री दुट्टे, निकिता पाटील, काजल सपकाळे, निकिता राठोड, निता बारे, सपना वंजारी, दिपाली गाजरे, ललिता इंगळे, व प्रगती कोल्हे इत्यादी स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निकिता कपले, प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. दीपक बावस्कर व प्रा. डॉ. छाया ठिंगळे तर आभार प्रदर्शन प्रा.विजय डांगे यांनी केले.

Protected Content