वरगव्हाण येथील पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्ट्राचाराच्या चौकशीची मागणी

a1cc08b7 f2e9 4167 ac23 7f4399c4f927

धानोरा, ता. चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे वरगव्हाण येथील पाणीपुरवठा योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराची चौकशी करावी, अशी मागणी तेथील ग्रामस्थ महेंद्र ज्ञानेश्वर पाटील व हैदर अब्दुल तडवी यांनी गट विकास अधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून केली आहे.

 

या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही या गावातील रहिवाशी असुन आमच्या गावाची लोकसंख्या सुमारे १५०० आहे. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी शासनामार्फत दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्या टाक्यासंपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी बनविण्यात आलेल्या आहेत, परंतु त्यापैकीएक टाकी ही तिच्या बांधकामापासुनच बंद आहे. ही टाकी बांधण्यासाठी नवनिर्माण योजनेव्दारे सुमारे २७ लाख रु. शासनामार्फत ग्रा.पं.ला मिळाले होते. सदर निधीतुन
सदरची रक्कम ही पुर्णपणे वापरण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात मात्र सदर टाकी ही बंदच आहे. तिचे बांधकाम झाल्यापासून ते आजपर्यंत पंचायतीने तिच्या वापरासाठी प्रयत्नही केलेला नाही. परिणामी आज गावक-यांना टाकी असूनही पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. सदर टाकी दुरुस्तीसाठी शासनामार्फत
पुन्हा निधी मिळाला असून तो देखील बुडित टाकण्यात आलेला आहे. अशारितीने सदर टाकी हीबांधकामापासून तर आजपर्यंत आहे त्याच स्थितीतीच आहे. या प्रकाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणीही यात करण्यात आली आहे. या निवेदानाची प्रत जि.प. मुख्याधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आली आहे.

Add Comment

Protected Content