चोपडा येथील ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलची शिरपूर येथे शैक्षणिक सहल

chopada news

चोपडा, प्रतिनिधी | येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट संचालित ऑर्किड इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची एक सहल नुकतीच (दि.३०) शिरपूर येथील विमानतळ आणि गार्डन येथे आयोजित करण्यात आली होती.

 

त्यानिमित्ताने संस्थेचे अध्यक्ष डॉ. राहुल पाटील, शाळेच्या प्राचार्या मिस परमेश्वरी व पालकांच्या उपस्थितीत सहलीच्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून विद्यार्थ्यांना आनंदी प्रवासाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रवासात विद्यार्थ्यांना शिरपूर विमानतळ व विमान दाखवण्यात आले. यावेळी पायलट धीरेंद्र कुमार यांनी विद्यार्थ्यांना विमानाविषयी माहिती दिली, शिरपूर गार्डनमध्ये विद्यार्थ्यांनी विविध खेळण्यांचा आनंद घेतला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी पावभाजीचा मनमुराद आस्वाद घेतला. त्यानंतर सर्व विद्यार्थी आपापल्या पालकांसोबत सुखरूपणे घरी गेले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content