प्रा. बोथरा यांच्या मालमत्तेवर बी. एच. आर.क्रेडिट सोसायटीचा जप्ती बोजा…!

 

चोपडा , प्रतिनिधी । येथिल महावीर पतसंस्थेतुन संस्थापक चेअरमन प्रा.शांतीलाल बोथरा यांनी मागील काही वर्षांत करोडो रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतावा व्हावा यासाठी गट नंबर ७४८ हे तारण दिले होते. परंतु ह्या मालमत्तेवरील रक्कम न भरता बोजा प्रभारी व्यवस्थापक राजेंद्र जैन यांनी उतरवुन दिला होता. मात्र, बी.एच. आर.क्रेडिट सोसायटीने आपल्या कर्जापोटी प्रा. बोथरा यांचा मालकीची चोपडा शिवारातील गट नंबर ७४८ वरील प्लॉटावर जप्ती बोजा बसविण्याच्या आदेश बजविला आहे.

सविस्तर असे की , चोपडा येथील महावीर पतसंस्थेतुन प्रा.शांतीलाल बोथरा हे संस्थापक चेअरमन असल्याने कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या कर्जापोटी गट नंबर ७४८ ही मिळकत संस्थेत तारण म्हणून तत्कालीन व्यवस्थापक शोभा सांखला यांनी करून घेतली होती. परंतु, रक्कम न भरता बोजा उतरवून दयावा असा तगादा प्रा. बोथरा यांनी लावला होता. तत्कालीन व्यवस्थापक शोभा सांखला यांनी नकार दिल्याने अखेर संस्थापक चेअरमन श्री. बोथरा यांनी आपला पदाचा दुरुपयोग करत शोभा सांखला यांना व्यवस्थापक पदावरून हटविण्यात आले. तद्नंतर व्यवस्थापक पद राजेन्द्र जैन यांच्याकडे सोपविण्यात आले. राजेंद्र जैन यांनी आपला पदभार स्वीकारल्या नंतर अवघ्या काही दिवसातच गट नंबर ७४८ चा रक्कम न भरता बोजा उतरवून दिला व करोडोचे कर्ज असुरक्षित करण्यात आले आहे ह्या मिळकतीवरील भाईचंद हिराचंद रायसोनी क्रेडिट सोसायटीने तहसीलदार कार्यालय, तलाठी कार्यालय ,व दुय्यम निबंधक कार्यालयात सरकारी लवाद अधिकारी ऍड.उदय कुलकर्णी यांच्या आदेश क्रमांक- १०७९ /२०२० लवाद दावा क्रमांक ३२/२०१६ नुसार जप्ती बोजा बसविण्यात आले आहे. प्रा.शांतीलाल बोथरा यांच्याकडे भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट को- ऑपरेटेव्ही सोसायटीचे सन २०१६ मध्ये ९३ लाख ४६ हजार ६५९ /- रुपये घेणे असल्याचे आदेशात म्हटले आहे. याबाबत शहर तलाठी श्री.सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनीही आदेशानुसार कारवाईचा दुजारा दिला आहे.

Protected Content