राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची नवीन कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली असून यात काही नवीन चेहर्‍यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या १०-११ सप्टेंबरला झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना कार्यसमिती सदस्य, स्थायी निमंत्रित, प्रदेशाध्यक्ष, आघाडीच्या संघटना, विभाग इत्यादींसह पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची नावे जाहीर करण्याचे अधिकार देण्यात आले. यानुसार पवार यांनी कार्यकारिणीची यादी जारी केली आहे. पक्षाच्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. यात अपेक्षेनुसार काही बदल दिसून आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सध्या कारागृहात असणारे माजी मंत्री नवाब मलिक यांना डच्चू मिळाला असून जितेंद्र आव्हाड यांचा समावेश झाला आहे.

 

राष्ट्रवादीची कार्यकारिणी –

राष्ट्रीय अध्यक्ष – शरद पवार

राष्ट्रीय उपाध्यक्ष – प्रफुल्ल पटेल

राष्ट्रीय सरचिटणीस – सुनील तटकरे

राष्ट्रीय सरचिटणीस – योगानंद शास्त्री

राष्ट्रीय सरचिटणीस – के के शर्मा

राष्ट्रीय सरचिटणीस – पीपी मोहम्मद फैजल

राष्ट्रीय सरचिटणीस – नरेंद्र वर्मा

राष्ट्रीय सरचिटणीस – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रीय खजिनदार – वाय पी त्रिवेदी

कायम सचिव – एस आर कोहली

राष्ट्रीय सचिव –

राष्ट्रीय सचिव – राजीव झा

राष्ट्रीय सचिव – हेमंत टकले

राष्ट्रीय सचिव – सच्चिदानंद सिंह

राष्ट्रीय सचिव – ब्रिजमोहन श्रीवास्तव

राष्ट्रीय सचिव – राजेंद्र जैन

राष्ट्रीय प्रवक्ते –

राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि माध्यम प्रभारी – नरेंद्र वर्मा

राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते – ब्रिजमोहन श्रीवास्तव

राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते – धीरज शर्मा

Protected Content