Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यातील दोघांचा सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

अमळनेर तालुक्यातील दोघांचा सोळाव्या मजल्यावरून पडून मृत्यू

0
102


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सुरत येथे लिफ्टची दुरूस्ती करतांना दोन जण सोळाव्या मजल्यावरून खाली पडून दगावले असून ते तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, सुरत येथील पांडेसरा भागात प्लॅटिनियम प्लाझा नामक सतरा मजली इमारतीचे काम सुरू आहे. शिरूड ता.अमळनेर येथील रहिवासी निलेश प्रल्हाद पाटील (वय २८) व आकाश सुनिल बोरसे (वय २२) हे दोन्ही जण त्या ठिकाणी लिफ्ट बसविण्याचे काम करीत होते. आज सकाळी देखील ते नित्यनेमानुसार कामाला गेलेले होते. १६ व्या मजल्यावर लिफ्ट दुरुस्त करण्याचे काम करत असतांना ते उभी असलेल्या शिडीचा तोल गेला. यात ते दोन्ही जण खाली पडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

नुकताच गावी गणेशोत्सव साजरा करून हे दोन्ही जण सुरत येथे लिफ्ट दुरूस्तीच्या कामासाठी गेले होते. मात्र आज काळाने त्यांच्यावर घाला घातल्याने शिरूड गावावर शोककळा पसरली आहे. .मयत आकाश बोरसे च्या पश्‍चात आई-वडील व एक मोठा भाऊ असा परिवार आहे. निलेश पाटीलच्या पश्‍चात वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.


Protected Content

Play sound