रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर शिक्षण संवर्धक संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत नवशक्ती पॅनलने जोरदार मुसंडी मारत ११ पैकी तब्बल ८ जागा जिंकून बहुमताचे स्पष्ट चित्र दिले आहे. सत्ताधारी प्रकाश मुजुमदार पॅनलला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागले असून, यामुळे त्यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाविषयी असलेल्या नाराजीला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.
संस्थेच्या सौ. कमलाबाई एस. अग्रवाल गर्ल्स हायस्कूल येथील जिमखाना हॉलमध्ये सर्वसाधारण सभेनंतर निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुरेश धनके यांनी काम पाहिले. सरदार जी. जी. हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. आर. पाटील व शिक्षकांच्या सहकार्याने शांततेत मतदान पार पडले. १४६ सदस्यांपैकी तब्बल १२९ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
नवशक्ती पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
अध्यक्ष: देवेंद्र श्रीकृष्ण मिसर (६५ मते)
उपाध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रभाकर आठवले (६८ मते)
सचिव: अक्षय राजेंद्र अग्रवाल (६९ मते)
संचालक: संतोष मदनलाल अग्रवाल (८० मते), शैलेंद्र विजयकुमार देशमुख (९३ मते), शितल रमेश पाटील (८७ मते), महेश सुरेश अत्रे (८४ मते), तुषार एकनाथ मानकर (६२ मते)
प्रकाश मुजुमदार पॅनलकडून निवडून आलेले उमेदवार :
डॉ. दत्तप्रसाद माधव दलाल (८८ मते)
उज्वल ओमप्रकाश अग्रवाल (६० मते)
विजय लोहार – डॉ. प्रेमराज पाटील यांच्यात समसमान मते पडल्याने ‘ईश्वर चिठ्ठी’द्वारे विजय लोहार यांची निवड जाहीर करण्यात आली.
या निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी पॅनलला स्पष्ट झटका देत नवशक्ती पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी नवशक्ती पॅनलला मजबूत पाठिंबा लाभल्याचे या निकालावरून दिसून येते.