मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यचे अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलीक यांना ईडीने अटक केल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी आज भाजपच्या आमदारांनी पुन्हा विधीमंडळाबाहेर आंदोलन सुरू केले आहे.
विधीमंडळ अधिवेशनात नवाब मलीक यांच्या राजीनाम्याचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच यावरून भाजपने जोरदार आंदोलन केले होते. तर सभागृहात देखील हाच मुद्दा चर्चेत राहिला होता.
या पार्श्वभूमिवर, आजपासून पुन्हा सुरू झालेल्या अधिवेशनाच्या दिवशी पुन्हा एकदा भाजपच्या सदस्यांनी विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन सुरू केले आहे. याप्रसंगी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत असून यात मलीक यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे. जोरदार घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून निघाल्याचे दिसून येत आहे.