बोगस कर्ज वाटप प्रकरणी दरेकर, धसांच्या अडचणीत वाढ 

मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | भाजपचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि बीड जिल्ह्यातील विधान परिषद आमदार सुरेश धस यांच्यामागे पुन्हा एकदा मुंबै बँक घोटाळ्याचा ससेमिरा लागला आहे. दरेकर आणि धस दाम्पत्यावर आर्थिक फसवणूकप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे राज्याच्या सहकार खात्याचे आदेश दिले आहेत.

बोगस दस्तावेजांच्या आधारे तब्बल 27 कोटींचं कर्ज वाटप केल्याप्रकरणी मुंबै बँकेचे माजी अध्यक्ष आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्यासह धस आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता धस यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्याच्या सहकार खात्यानं दिल्यानं खळबळ उडालीय. दरेकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आक्षेपाची बाब म्हणजे, धस यांच्या जयदत्त अॅग्रो इंडस्ट्रीज, अंभोरा आणि मच्छिंद्रनाथ ओव्हरसीज प्रा. लि., आष्टी या केवळ कागदोपत्री उद्योगांना हे कर्ज वाटप करण्यात आलं आहे. तसेच त्यासाठी बोगस दस्ताऐवज तयार करण्यात आले आहेत.

Protected Content