लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार : सुप्रिया सुळे

मुंबई (वृत्तसंस्था) लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी ‘जय श्री राम’ म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा देणाऱ्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

पार्थ पवार यांनी पत्र लिहून राम मंदिरावर आपली भूमिका स्पष्ट केली होती. यात त्यांनी सुरुवातच ‘जय श्री राम!’ म्हणून केली आहे. अयोध्येत श्री राम जन्मभूमीचे भुमिपूजन होत आहे. श्रद्धा आणि सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असलेले श्री राम अखेरीस शांतपणे आपल्या घरी येतील. हा लढा कडवट आणि प्रदीर्घ होता. अखेरीस एक पूर्ण पिढी एका ऐतिहासिक दिवसापशी येऊन ठेपली आहे. त्यामुळे आपण हिंदू श्रद्धेच्या पुनर्स्थापनेचा क्षण अनुभवणार आहोत, असे मत व्यक्त केले. तसेच आपण राम जन्मभूमी प्रकरणातून एक मोठा धडा शिकला पाहिजे असे आवाहनही पार्थ पवार यांनी नागरिकांना केले होते. त्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, लोकशाहीत प्रत्येकाला भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सगळ्यांना दडपशाहीची इतकी सवय झाली आहे का की व्यक्तिस्वातंत्र्याचा विसर पडला आहे? असा सवालही त्यांनी विचारला.

Protected Content