Home राजकीय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पंकजा मुंडे यांची अप्रत्यक्ष मागणी

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची पंकजा मुंडे यांची अप्रत्यक्ष मागणी


 

मुंबईः वृत्तसंस्था । करुणा शर्मा आणि रेणू शर्मा यांच्या प्रकरणात धनंजय मुंडेंनीही राजीनामा द्यावा, असंच पंकजा मुंडेंनी सुचवलंय.

 

काही दिवसांपासून राज्यात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण गाजत आहे. त्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामाही घेतलाय. अशाच एका प्रकरणात धनंजय मुंडेसुद्धा अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मोठं विधान केलंय.

 

जर कोणावर अशा प्रकारचं बोट दाखवलं गेलंय. त्यांनीच स्वतःची भूमिका ही स्वतःहून घेतली पाहिजे, अशी माझी अपेक्षा आहे. मग राजकीय जीवनामध्ये लोक त्यांच्याकडे मान उंचावून बघतील. व्यक्तिगतही मी या गोष्टीचं कधीच समर्थन करू शकत नाही. ज्यांच्यावर आरोप होतात, त्यांनीच भूमिका घ्यायला हवी, असंही भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्यात.

 

 

धनंजय मुंडेंचा निर्णय त्यांच्या पक्षाने घ्यावा. त्यांनी भूमिका ही नैसर्गिक घ्यायला पाहिजे. धनंजय मुंडे प्रकरणाचं समर्थन करू शकत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा ही आमच्या पक्षाचीही मागणी आहे. राजकारणात काय पायंडे चाललेत ते स्त्रियांच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत. झगडणाऱ्या स्त्रीसाठी, चांगला काम करणाऱ्या स्त्रीसाठी एक मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

 

 


Protected Content

Play sound