भर दिवसा रिव्हॉल्वरच्या धाकाने १५ लाखांची लूट

जळगाव प्रतिनिधी । दुचाकीवरून १५ लाख रूपयांची कॅश घेऊन जाणार्‍या दोघांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड घेऊन फरार झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. https://livetrends.news

याबाबत वृत्त असे की, एमआयडीसीतील प्रभा पॉलीमर कंपनीचे कर्मचारी महेश चंद्रमोहन भावसार (वय ५३, रा. दिक्षीतवाडी, जळगाव) आणि संजय सुधाकर विभांडीक (वय-५१, रा. महाबळ कॉलनी, जळगाव) हे व्‍आज दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास १५ लाख रूपयांची रोकड घेऊनच्या दिशेने जात होते. यातील महेश भावसार यांच्याकडे रोकड असून ते एका दुचाकीवर होते. तर विभांडीक हे त्यांच्या सोबत दुसर्‍या दुचाकीवरून जात होते. हे दोन्ही जण पंचमुखी हनुमान मंदिराजवळच्या पद्मावती मंगल कार्यालयाजवळ आले असतांना त्यांना दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन जण दुचाकीवर येवून पैसे घेवून जाणारे भावसार आणि विभांडिक यांना थांबवण्याचा प्रयत्न केला.  https://livetrends.news

यातील एकाने महेश भावसार यांच्याकडून रोकड असणारी बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र यात त्याला यश आले नाही. यामुळे चोरट्याने रिव्हॉल्व्हर काढून त्यांना धमकावले. याप्रसंगी झालेल्या झटापटीत रिव्हॉल्व्हरची मॅगेझीन खाली पडली. या झटापटीत भावसार आणि विभांडीक हे जखमी झाले आहेत. तर चोरट्यांनी दुचाकी जागेवर सोडून एकाच दिशेने पळ काढला. अवघ्या काही मिनिटांमध्ये हा थरार घडल्याने पंचमुखी हनुमान मंदीर परिसरात खळबळ उडाली आहे.  https://livetrends.news

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी व एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्यदर्शीच्या मते दोन्ही चोरट्यांनी एकाच दिशेने पलायन केले. पोलिसांनी खाली पडलेले मॅगेझीन जप्त करून चौकशीस प्रारंभ केला आहे. भर दिवसा घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. https://livetrends.news

परिसरातील सीसीटिव्हीमध्ये हे चोरटे दिसून येतील अशी शक्यता असून पोलिसांनी या दृष्टीने तपास सुरू केला आहे. यातील एका फुटेजमध्ये चोरट्याच्या शरीराचा खालील भाग आला असून तो वेगाने पळत असल्याचे दिसून आले आहे. यात रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावणार्‍या चोरट्याने जीन्सची पँट आणि पांढरा शर्ट घातल्याची माहिती भावसार आणि विभांडीक यांनी दिलेली आहे. https://livetrends.news 

Protected Content