हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात गाय ठार

 

भडगाव, प्रतिनिधी । शेत शिवारातील एरंडोल रस्त्तालगत बिबट्याचा गेल्या चार महिन्यांपासून धुमाकूळ सुरू आहे. यामध्ये त्याने गाई, म्हशी, कुत्रे, रानडुक्कराचा फडश्या पाडल्याची घटना ताजी असताना बिबट्याने आपला मोर्चा पिंपळगाव रस्त्याकडे वळविला आहे. पिंपळगाव रस्तालगत शेतात बांधलेल्या गाईला ठार केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे.

पिंपळगाव रस्त्यालगत असलेल्या विनोद राजाराम पाटील यांच्या शेतात बांधलेल्या गाईवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याची घटना रात्री घडली आहे. या परिसरातील शेतकरी वर्गात व पेठ परीसर नागरी वस्ती भागातील रहिवाशीमध्ये बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील विनोद राजाराम पाटील रा.पेठ यांचे पिंपळगाव रस्त्यालगत शेत आहे. त्यांनी शेतात मका लावलेला आहे. शेतातील पत्रा शेडमध्ये त्यांनी आपली गाय बांधली होती. रात्रीच्या सुमारास बिबट्याने बांधलेल्या गाईवर हल्ला करत ठार मारले व पोट फाडून त्यातील मास खाल्ले. याबाबत शेतकरी विनोद पाटील हे सकाळी शेतात गेले असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. या अगोदर अनेक वेळा वनविभागाला माहिती देण्यात आली होती. त्याच वेळी वनविभागाने सापळा रचून बिबट्याला जेरबंद केले असते तर आज गाईचे प्राण वाचले असते. तसेच या ठिकाणावरून भडगाव शहरातील पेठ भाग हा जवळ असल्यामुळे या भागातील रहिवासी व शेतकरी यांच्या मनात दहशत निर्माण झाली असून लवकरच बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी होत आहे.

 

Protected Content