चाळीसगाव प्रतिनिधी । शिवनेरी फाउंडेशन संचलित अभियान अंतर्गत भूजल अभियानाला तालुक्यात सुरुवात करण्यात आली असून तालुक्यातील डोणप्रिंप्री या गावी सेवा सहयोग फाउंडेशनच्या सहकार्याने पोकलेन मशीन उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आले आहे.
शिवनेरी फाउंडेशन संचलित अभियान अंतर्गत भूजल अभियाना मध्ये चाळीसगाव तालुक्यातील जलसंधारणाच्या कामांना सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षापासून भूजल अभियान तालुक्यात जल साक्षरता व जल संधारणाची कामे करत आहे. डोणप्रिंप्री या गावी सेवा सहयोग फाउंडेशन च्या सहकार्याने पोकलेन मशीन उपलब्ध करून दिले असून शेतकरी गुणवंत सोनवणे यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. येथील शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर पाणी अडवण्यासाठी नाला खोलीकरण करून घेत, स्वखर्चाने डिझेल टाकून पोकल्यान मशीन उपलब्ध झाल्याने कामांना सुरुवात केली आहे. खरेतर शास्त्र आणि शिस्त या दोन गोष्टींना अनुसरून आपले गाव पाणीदार करण्यासाठी डोणप्रिंप्रीकर सरसावले आहेत. गेल्या वर्षी तालुक्यात चाळीसगाव वॉटर कप स्पर्धेसाठी तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आर्थिक सहाय्य केले होते. अद्यापपर्यंत तालुक्यातील ११ गावांमध्ये कामे होऊन ५३ कोटी लिटरचा जलसाठा निर्माण झाला आहे. यावर्षी ३५ गावांचे नियोजन पुर्ण झाले असुन ३५ गावांची माहिती संकलन करून गावांचा जल आराखडा ही तयार करण्यात येणार आहे.
जल आराखडा तयार करून तांत्रिक दृष्ट्या जल संधारणाचे काम मोठ्या प्रमाणात निर्माण करण्याचे उद्दीष्ट शिवनेरी फाऊंडेशन संचलित भूजल अभियान हे साध्य करणार आहे. त्या अनुषंगाने मिळालेल्या पोकलॅन्ड मशिनच्या कामाचा नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी दि २१ रोजी डोणप्रिंप्र प्रगतशील शेतकरी सुनील साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डोणप्रिंप्री सरपंच सचिन पाटील, कृषी सहायक तुफान खोत, भूजल टीमचे तालुका समन्वयक राहुल राठोड, शाम सोनवणे, जितेंद्र पाटील, गुलाब धनगर, साबळे, शरद सोनवणे आदी शेतकरी उपस्थित होते.