यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असतांना आज यावलमध्ये तब्बल दहा वर्षांपासून पदवी नसतांनाही रूग्णांची आर्थिक लूट करणार्या मुन्नाभाई टाईप डॉक्टरच्या विरूध्द आज पोलीस कारवाई करण्यात आली आहे.
यावल तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बंगाली डॉक्टरांचा धुमाकूळ सुरू असून कोणतीही डिग्री व अधिकृत परवाना नसतांना ते रूग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांची आर्थिक लूट करत असल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजच्या माध्यमातून आधीच मांडण्यात आले आहे. यानंतर आज यावलमधील अशाच एका बोगस डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.
शहरात गेल्या दहा वर्षापासुन औषद्य उपाचाराच्या नांवाखाली रूग्णांची आर्थिक लुट करणार्या बंगाली बिजनकुमार नियमाइचंद राय नांवाच्या व कोलकत्ता ( पश्चीम बंगाल ) येथील मूळ रहिवाशी असणार्या बोगस डॉक्टरच्या विरूध्द आज अखेर कारवाई करण्यात आली. या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व तक्रारकर्त यावल तालुकामेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी संख्या उपस्थित कारवाई करण्यात आली आहे. त्या बोगस बंगाली डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन , या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
याप्रसंगी डॉ रमेश पाचपोळे, डॉ धीरज पाटील , डॉ तुषार फेगडे , डॉ गणेश रावते ,डॉ मनोज वारके, डॉ. दाऊद खान , डॉ ईमरान शेख, डॉ. कुंदन फेगडे , डॉ सतिष अस्वार आदींची उपस्थिती होती. दरम्यान, यावलमधील अवैध बंगाली डॉक्टरला अटक करण्यात आली असली तरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठाण मांडून बसलेल्यांवर कधी कारवाई होणार ? हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.