अल्पसंख्यांक दिनानिमित्त उद्या यावलमध्ये कार्यक्रम

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |  पीस एज्युकेशनल अन्ड वेलफेअर सोसायटी तर्फे परिसरात पहील्यांदा जागतिक अल्पसंख्यांक दिवस साजरा केल्या जात आहे.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे अल्पसंख्यक समाजात शिक्षण, क्रीड़ा, शेति, व्यवसाय, विधी, समाजसेवा, चिकित्सा अश्या अनेक क्षेत्रात उत्तम कामगीरी केलेल्या नागरिकांचा सत्कार व सम्मान करण्यात येणार आहे. तसेच अल्पसंख्यक समाझात नवयुवकाना मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्या करता मार्गदर्शिका च्या स्वरूपात डॉ रागीब अहमद (जळगाव) एहसान सैय्यद (मुंबई) व अख़लाक़ शेख (मुंबई) हे कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक असणार आहेत.

कार्यक्रम ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल यांचा अध्यक्षतेखाली होणार असून याचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक करीम सालार यांच्या हस्ते पार पडणार आहे. तसेच याप्रसंगी  धनंजय शिरीषदादा चौधरी ह्यांचा हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पीस एज्युकेशनल एन्ड वेलफ़ेयर सोसायटी ने दिली आहे.

Protected Content