लोकायुक्त विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री यांचे मानले आभार

मुंबई-वृत्तसेवा | लोकायुक्त विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी फोनवरून संवाद साधून त्यांना बातमी दिली. यावेळी हे विधेयक संमत केल्याबद्दल अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.

यावर अण्णांनी समाधान व्यक्त करत तुमच्या कारकिर्दीत हे विधेयक संमत करून घेतलेत याचा विशेष होत असल्याचे मत व्यक्त केले. हे विधेयक झाल्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल, भ्रष्टाचाराला आळा बसेल, असेही त्यांनी सांगितले.

काही जणांचा हे विधेयक मांडण्याचा विरोध होता, मात्र अण्णा जे काही सांगतील, मात्र अण्णा जे काही सांगतील ते सर्वसामान्य लोकाच्या भल्याचेच असेल याची खात्री पटल्याने या विधेयकाच्या मार्गातील सगळे अडथळे बाजूला करून ते संमत केल्याचे मुख्यमंत्री यांनी स्वत:हून फोन करून संवाद साधल्याबद्दल अण्णांनी त्यांचे आभार मानले.

Protected Content