पार्कींगची स्वतंत्र व्यवस्था करा : मुक्ताईनगर नगरपंचायतीला आली जाग !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर स्टेट बँकेसमोर विद्यार्थीनीला बसने उडविल्याची घटना घडली होती. या संदर्भात लाईव्ह ट्रेंडस न्यूजने दिलेल्या वृत्तानंतर नगरपंचायत प्रशासन जागी झाले आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारी मुक्ताईनगरात अपघात घडला होता. यात एमएच १४ बीटी ४१० या क्रमांकाच्या शेगाव ते नवापूर या बसने ऋतुजा राजेंद्र कोल्हे या विद्यार्थीनीला धडक दिली होती. यात सदर विद्यार्थीनीची सायकल पूर्णपणे चक्काचूर झाली असून ऋतुजा जखमी झाली असून तिला उपचारासाठी रूग्णालात दाखल करण्यात आले होते.

मुक्ताईनगराच्या प्रमुख रस्त्यावरील प्रमुख व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि दुकानांमध्ये पार्कींगची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे त्यांच्या ग्राहकांची वाहने ही रस्त्यावरच लागत असतात. यामुळे रस्त्यावर नेहमी वाहतुकीची कोंडी होत असते. यातूनच अनेकदा लहानमोठे अपघात होत असतात. या प्रकरणी मुक्ताईनगर नगरपंचायतीची अतिशय सुस्त भूमिका असल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजने प्रकाशित केले होते. यामुळे अखेर नगरपंचायतीचे निद्रीस्त प्रशासन जागी झाले आहे.

आज मुक्ताईनगर नगरपंचायत प्रशासनाने मुख्य मार्गावरील दोन बँकांसह सर्व दुकानदारांना नोटीस बजावून पार्कींगची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थात, याला संबंधीत कितपत प्रतिसाद देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content