मुंबई प्रतिनिधी | दिग्गज विनोदी अभिनेता कपिल शर्मा याच्या जीवनावर फनकार या नावाची चित्रपट येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कपील शर्मा याच्या विनोदाचे जगभर चाहते आहेत. लवकरच त्याच्या जीनवानवर आधारित असलेला म्हणजेच कपिल सर्माचा एक बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट मृगदीपसिंह लांबा दिग्दर्शित करणार असून त्याची निर्मिती महावीर जैन करणार आहेत. या चित्रपटाचे नाव फनकार आहे. कपिल शर्माच्या जीवनाचा उलगडा करणारा एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून सुरु होती. मात्र हा चित्रपट कोण करणार आहे, त्याचे दिग्दर्शन कोण करेल, याबाबत अस्पष्टता होती. मात्र मृगदीप यांच्या घोषणेनंतर सर्व चित्र स्पष्ट झाले आहे.
कपिल शर्मा याने अतिशय मेहनत करून आजचे स्थान मिळविले आहे. त्याच्या जीवनातील संघर्षाचा प्रवास या चित्रपटात मांडण्यात येणार आहे. तर दुसरीकडे कपिल शर्मा आता नेटफ्लिक्सवरदेखील आपला शो घेऊन येत आहे. नेटफिल्कसने कपिल शर्मासोबतचे एक टीजर लॉन्च केले असून आय ऍम नॉट डन स्टील असे कॅप्शन देण्यात आले. या शोमध्ये कपिल शर्मा आपल्या आयुष्यातील काही मजेदार किस्से तसेच चटपटीत विषयावर भाष्य करताना दिसणार आहेत.