जळगाव प्रतिनिधी । एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृतीप्रित्यार्थ दोन दिवसीय १४व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला.
एस. एस. मणियार विधी महाविद्यालय डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे स्मृतीप्रित्यार्थ दोन दिवसीय १४व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेचे उद्घाटन शनिवारी झाले. या स्पर्धेचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती ए. एम. ढवळे यांच्याहस्ते करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. बी. युवाकुमार रेड्डी यांनी केले. या वेळी केसीई सोसायटीचे सचिव अॅड. एस. एस. फालक, सहसचिव अॅड. प्रमोद पाटील, सदस्य अॅड. सुनील डी. चौधरी, मूट कोर्ट सोसायटी समन्वयक डॉ. विजेता सिंग, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. पंढरीनाथ चौधरी, प्रा. रेखा पाहुजा, प्रा. जी. व्ही. धुमाळे, प्रा. योगेश महाजन, प्रा. अंजली बोंदर, प्रा. ज्योती भोळे व महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. न्यायमूर्ती ढवळे यांनी वकिलांनी यशाच्या पाठीमागे न धावता प्रामाणिक मेहनत घेतल्यास यश नक्कीच मिळेल असे आपल्या मनोगतातून नमूद केले. ऋतुजा लाठी व निरंजन ढाके यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डी. आर. क्षीरसागर यांनी आभार मानले. या स्पर्धेत देशभरातील विधी महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले आहेत.