आयुक्त डांगे यांच्या बदलीमागे आमदार भोळे- सुनील महाजन यांचा आरोप (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । येथील महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्या बदलीमागे आमदार राजूमामा भोळे हेच असल्याचा आरोप आज माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी केला. या बदलीमुळे शहरातील कामे थांबण्याची भितीदेखील त्यांनी व्यक्त केली.

महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे याची अवघ्या आठ महिन्यांमध्ये बदली झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राजकीय दबावामुळे आयुक्तांची खूप आधीच बदली करण्यात आल्याचे मानले जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीमध्ये या बदलीमागे आमदार राजूमामा भोळे हेच असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, अनेक वर्षानंतर महापालिकेला आयएएस अधिकारी हा आयुक्त म्हणून लाभला होता. मात्र मध्यंतरी झालेल्या सत्तातरानंतर त्यांच्याशी आमदारांचे खटके उडाले. यातूनच त्यांची बदली करण्यात आली. एखादा नवीन अधिकारी शहरात रूळण्यासाठी चार-पाच महिन्यांचा कालावधी लागत असतो. यातच आता लवकरच आचारसंहिता लागणार असल्यामुळे शहरातील विकासकामांना अडसर निर्माण होणार असल्याकडेदेखील सुनील महाजन यांनी लक्ष वेधले.

पहा– सुनील महाजन यांनी नेमके आमदार राजूमामा भोळे यांच्यावर काय आरोप केलेत ते !

Add Comment

Protected Content