शिक्षिका मनीषा चौधरींच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अमळनेर (प्रतिनिधी) शिक्षकांनी विद्यार्थी यांचे नाते मुला सारखे असते. विद्यार्थ्यांच्या भावना आणि आर्थिक अडचणी समजून घेत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम अनेक वर्षापासून अमळनेर तालुक्यातील शिरसाळे जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षिका मनीषा चौधरी या करीत आहते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र सध्या कौतुक होत आहे.

आपल्या शाळेतील गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात यावेत यासाठी दरवर्षी शाळेचे दप्तर वह्या पेन कंपास पेटी या ड्रेस स्वतःचा पगारातून देत असतात. या शिक्षिका एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी आतापर्यंत अनेक मुलांना व मुलींना आर्थिक मदत तर केलीच आहे. पण पाच मुलींना दत्तक घेऊन आपल्या पोटच्या मुलासारखं त्या वागवत आहे. म्हणूनच शिक्षिका मनीषा चौधरी बनल्या अनेक निराधारांचे आधार असल्यामुळ त्यांचे कौतुक सध्या अमळनेर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातून सुरु आहे.

शिक्षिका मनीषा चौधरी यांनी आपल्या पगारातून दर महिन्याला त्यांचे पाचशे रुपये प्रमाणे बचतीचेे खाते उघडले आहे. कार्यक्रम कोणताही असो, त्यासाठी मनीषा चौधरी यांचा मोठा सहभाग ठरलेला असतो. त्याचपद्धतीने सौ.चौधरी यांनी ग्रामीण भागातील मुलींसाठी मोफत सॅनिटरी पॅड बँक देखील सुरू केली आहे. शिरसाळे गावातील मनिषाताई चौधरी शिक्षिका आहेत. या सावित्रीमाईंच्या लेकीने “मोफत सँनेटरी पँड बँक ” सुरु केल्यामुळे आजुबाजुच्या 5 खेड्यांवरील मुलींसाठी मोठी सोय झाली आहे. मासिक धर्म आला की, मुली घाबरून जातात. त्यांना याविषयी माहीती व्हावी, त्यांची अंधश्रद्धा व भीती नाहीशी व्हावी तसेच सहज मोफत पँड उपलब्ध व्हावे, यासाठी शिक्षिका चौधरी या विशेष परिश्रम घेत असतात. मनीषाताईंनी आपल्याच शाळेतील 5 मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले. शिक्षिका मनीषा चौधरी यांच्या या उपक्रमाचे तालुक्यातून कौतुक होत आहे.

Add Comment

Protected Content