जळगाव शहरात तीन दुकाने फोडली; हजारोंचा ऐवज लंपास


जळगाव (प्रतिनिधी) शहरातील जुन्या बी जे मार्केट मध्ये काल ( शुक्रवारी ) रात्री तीन दुकाने फोडून सुमारे ५० हजारांचा ऐवज लंपास करण्यात आल्याची घटना घडली आहे.

अधिक माहिती अशी की, बी जे मार्केट मधील दुकान क्र १ मधील विजयं कृषी भांडार हे कन्हैया विजयकुमार सोमाणी यांच्या मालकीचे दुकान त्यांनी दररोज प्रमाणे सायंकाळी ७ च्या सुमारास बंद केले आणि ते पिंप्राळा येथे घरी गेले. त्यांना रात्री ९.३० च्या सुमारास फोन वरून त्यांचे दुकान फोडल्याची माहिती मिळाली, त्यानुसार त्यांनी दुकानात जाऊन बघितले असता गल्ला फोडून ४७ हजारांची रक्कम चोरीस गेल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे दुकान क्र ८० हे सुनील भानुदास पाटील यांच्या मालकीचे दुकान परीस ऑटो येथेही चोरी करण्यात येऊन ८०० रुपये रोख लंपास करण्यात आले. या शिवाय रमेश चांदीवाल यांच्या मालकीचे चांदीवाल मेडिको हे दुकानही फोडण्यात आले मात्र तेथून चोरी करण्यात चोरट्यांना अपयश आले. घटनास्थळी पोलिसांनी चोरट्यांच्या बोटाचे ठसे मिळविण्याचा प्रयत्न केला. या घटनांबाबत शनिवारी संबधित पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरलेले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here