दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी महापालिकेसमोर आमरण उपोषण (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने दिव्यांग सेना, सामाजिक संस्थांच्या वतीने आज महानगरपालिकेसमोर विविध मागण्यांसाठी आमरण उषोषण करण्यात येत आहे. विविध मागण्यांचे निवेदन महापालिका प्रशासनाला देण्यात आले

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ३ डिसेंबर हा जागतिक अपंग दिन म्हणून साजरा केला जातो. परंतू दिव्यांग बांधवांना हक्काच्या मागण्यांसाठी आज महापालिकेसमोर आंदोलन व उपोषण करण्यात येत आहे. जळगाव महापालिकेच्या भोंगळ काराभारामुळे दिव्यांग बांधवाना कोणत्याही सवलती व मदत मिळत नाही.

दिव्यांग बांधवांनी मागण्यांमध्ये महापालिकेत दिव्यांग बांधवांना शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये दिव्यांगांसाठी गाळे उपलब्ध करून देणे, महापालिकेच्या वतीने ५ टक्के निधी दिव्यांग बांधवांना वाटप करावे, महापालिकेच्या जागेवतर दिव्यांगांना झुणका भाकर केंद्रासाठी जागा उपलब्ध करून द्यावे, महापालिकेच्या रूग्णालयात दिव्यांगांना मोफत उपचाराची सुविध उपलब्ध करून द्यावी, पाच टक्के निधीतून दिव्यांग बांधवांना घरपट्टीत सुट मिळावी, मतीमंद मुलांच्या पालक संघटनाना सहाय्य अनुदान देण्यात यावे, दिव्यांगांसाठी स्वयंरोजगारासाठी स्वत: पायावर उभे राहण्यासाठी झेरॉक्स मशीन देण्यात यावी, कर्णबधिर व्यक्तिंसाठी विविध प्रकारची श्रवणे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.

या निवेदनावर दिव्यांग सेनेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन, जिल्हा उपाध्यक्ष शेख शकील शेख मुतालीक, हरीराम तायडे, योगीता जाधव, इकमोद्दिन शेख, संगिता प्रजापत, किशोर नेवे, प्रदिप चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, नितीन सुर्यवंशी, तोसिफ शहा, मिलींद पाटील, गणेश पाटील मतीन शेख यांच्यासह इतर दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1016609375520142/

Protected Content