मान्सुई रुग्णालयातील आग आटोक्यात

जळगाव (प्रतिनिधी) येथील विसंजी नगरमधील मान्सुई रुग्णालयात लागलेल्या आगीनंतर रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र निर्माण झाले होते. डॉक्टर राजीव देशमुख यांचे मान्सुई रुग्णालयाच्या तिसर्‍या मजल्यावर आज दुपारी लाकडी झोपडीला दुपारी दोन वाजेच्या सुमारास आग लागल्यामुळे रुग्णालयात पळापळ झाली. परंतु अग्निशामक दलाने तात्काळ दाखल होत पुढील अनर्थ टाळला. थोड्याच आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक शामक दलाला यश आल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली.

येथील विसंजीनगरमध्ये मान्सुई हॉस्पिटल आहे.तेथे आज नेहमीप्रमाणे रुग्णाची तपासणी सुरु होती. दुपारी हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावर डॉ राजीव देशमुख यांनी असलेल्या लाकडी रूम बनविली आहे. दुपारी साधारण 1.45 ते 2 वाजेच्या सुमारास तेथे अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या टाकीतून पाणी फेकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात जळगाव अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने चांगलाच पेट घेतला होता. . आग विजवण्यासाठी जवळपास एक तास लागला. सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. आगीचे वृत्त समजताच रुग्णालयात असलेल्या रुग्णांना रुग्णालयासमोरील बोळीत ठेवण्यात आले. आगीचे वृत्त कळताच माजी महापौर विष्णू भंगाळे यांनी घटनास्थळी भेट देत आग विझविण्यासाठी मदत केली. आग विझवण्यासाठी आलेल्या अग्निशामक दलाच्या पाईप जागोजागी लिक असल्यामुळे अनेक ठिकाणी पाइपातून कारंज्याप्रमाणे पाणी उडत होते. त्यामुळे जळगाव अग्निशामक दलाचे साहित्य खराब असल्याचे समोर आले. यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात होते.

Add Comment

Protected Content