बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने पटकावली चार पारितोषिके

जळगाव (प्रतिनिधी) नागपूर येथे काल पार पडलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्यस्तरीय उत्कर्ष या सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संघाने चार पारितोषिके पटकावली.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथे 27 ते 30 जानेवारी दरम्यान उत्कर्ष स्पर्धा झाली. या स्पर्धेत माधुरी पाटील (जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय,जळगाव) या विद्यार्थिनीला निबंध स्पर्धेत प्रथम , धर्मेश हिरे (विद्यावर्धिनी महाविद्यालय, धुळे) याला वक्तृत्व स्पर्धेत तृतीय तसेच अविनाश पाटील (प्रताप महाविद्यालय, अमळनेर) याला काव्य वाचनात तृतीय आणि बिजल राणा (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर) या विद्यार्थिनीला चित्रकला स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला ही चार पारितोषिके प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी विद्याथ्र्यांचा सत्कार केला. यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्रा.एस.टी.इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळ संचालक बी.पी.पाटील, प्रभारी वित्त व लेखाधिकारी एस.आर.गोहिल, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा.सत्यजित साळवे यांनीही विद्याथ्र्यांचे अभिनंदन केले. विद्यापीठाच्या या संघात 19 जण सहभागी झाले होते. संघ व्यवस्थापक म्हणून डॉ.नामदेव गजरे (कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवापूर) यांनी काम पाहिले. या संघात जयेश साळुंखे, राजू तडवी, आकाश धनगर, भूषण भदाणे, रोहित पवार,आशिष पाडवी, कृष्णा कोकणी, ऐश्वर्या झोपे, पुनम पवार, तेजस्वीनी तायडे, हेमलता जिरे, गुंटूर कुजानकीकाव्या, निता पावरा, सोनाली कोकणी या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

Add Comment

Protected Content