नूतन मराठातील वादाचे लोकसभा निवडणुकीत उमटणार पडसाद

जळगाव प्रतिनिधी । नूतन मराठाचे संचलन करणार्‍या जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळात राजकीय हस्तक्षेप करून समाजात दुहिचे बिजारोपण करणार्‍या राजकीय कावेबाजपणाचा मुद्दा या निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ मर्यादीत ही जिल्ह्यातील सर्वात मोठी संस्था आहे. मराठा समाजाची ही आद्य तसेच मातृ शैक्षणिक संस्था मानली जाते. बहुजन समाजातील लक्षावधी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे अविरत काम करणारी ही संस्था अलीकडच्या काही वर्षांमध्ये अडचणीत आली आहे. अनेक मराठेतर नेत्यांनी आपापल्या राजकीय स्वार्थासाठी यात हस्तक्षेप केल्याचे वारंवार दिसून आले आहे. यामुळे ही संस्था अनेकदा वेठीस धरण्यात आल्याचे सर्वांनी अनुभवले आहे. यातील सर्वात भयंकर प्रकार हा अलीकडे दिसून आला आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधकांनी सत्ता मिळवल्यामुळे संस्थेच्या प्रगतीचा मार्ग खुला होण्याची आस निर्माण झाली होती. मात्र जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने आधीच्या सत्ताधार्‍यांमागे आपली ताकद उभी करून संस्थेतील फुटीला प्रोत्साहन दिले. यातून झालेल्या वादात समाजातील अनेक जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले. अर्थात, यामुळे मराठा समाजामध्ये संतापाची लाट उसळली होती. हे वाद आता न्यायप्रविष्ठ असून यातून नूतन मराठाच्या प्रगतीत जाणीवपूर्वक अडसर निर्माण करण्यात राजकीय मंडळी यशस्वी ठरले आहेत. अर्थात, याचमुळे मराठा समाजाचा मानबिंदू असणारी संस्था पुन्हा एकदा प्रचंड अडचणीत आली आहे.

येत्या दोन दिवसात जळगाव लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून यात जळगाव जिल्हा विद्या प्रसारक मंडळातील राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दादेखील महत्वाचा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याचा फटका राजकीय हस्तक्षेप करणार्‍याच्या समर्थकाला बसण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content