मनी लॉड्रिंग : रॉबर्ट वढेरांना मदत केल्याचा आरोप असणाऱ्या उद्योजकाला अटक

robert vadra 2 660 032615085617 020619045747

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात मनी लाँड्रिंग आणि शस्त्र विक्रेता संजय भंडारीच्या विदेशातील कथित अवैध संपत्तीशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) अनिवासी भारतीय (एनआरआय) उद्योगपती सी. सी. थंपी याला अटक केली आहे. थंपी यांनी लंडनमधील गृहनिर्माण क्षेत्रात गुंतवणूक करण्यास वढेरा यांना मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

 

दुबईतील स्काइलाइट कंपनी ‘थंपी’च्या नियंत्रणाखाली आहे. भंडारीची कंपनी सॅनटॅक एफझेडईने २००९मध्ये एका खासगी कंपनीकडून लंडनमध्ये मालमत्ता खरेदी केली होती. ही मालमत्ता स्काइलाइटची होती. वाड्रा यांनी लंडनमधील ही मालमत्ता खरेदी केली होती आणि या मालमत्तेशी संबंधित वाड्रा आणि भंडारी यांच्यातील कथित मेल हे या प्रकरणातील पुरावे आहेत, असा आरोप आहे. थंपीच्या अटकेमुळे रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधातील प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण मिळालेले आहे. दुबई, लंडन आणि अन्य देशांतील बेनामी संपत्तीप्रकरणी ईडीनं वाड्रा यांची गेल्या दोन वर्षांत तब्बल १३ वेळा चौकशी केली आहे.

Protected Content