रोहिणी खडसे यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे साजरा

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांचा वाढदिवस मुक्ताईनगर येथे विविध कार्यक्रमा द्वारे मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

 

राष्ट्रवादी युवक काँग्रेस व रेड प्लस ब्लड जळगावच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.  यामध्ये दिडशे रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. खडसे फार्म येथे भोटा ग्रामस्थांच्या वतीने रोहिणी खडसे यांची लाडू तुला करण्यात आली.  यावेळी मुक्ताई नगर तालुक्यातील प्रमुख ग्रामपंचायत असलेले वढोदा येथील उपसरपंच रंजना कोथळकर  यांनी आपल्या समर्थकांसह  आणि पंचाने येथील शिंदे गट व भाजप पदाधिकारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.  नगरसेवक मस्तान कुरेशी यांच्या तर्फे रोहिणी खडसे यांची लाडु तुला करण्यात आली. निलेश भालेराव यांच्या तर्फे अन्नदान करण्यात आले. मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी तर्फे जे ई स्कुल येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय विविध लोकोपयोगी कार्यक्रमांनी रोहिणी खडसे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अजय बढे यांच्या तर्फे 38 किलो वजनाचा केक कापण्यात आला. अखिल चौधरी यांच्यातर्फे तीन क्विंटल फुलांच्या पुष्पहारा द्वारे रोहिणी खडसे यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रोहिणी खडसे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, किसान सेल जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे ,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील,वक्ता सेलचे विशाल खोले महाराज, युवती सेल जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे, जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिपक पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बोदवड तालुका अध्यक्ष प्रशांत पाटील, जि. प. सदस्य निलेश पाटील, कैलास सरोदे,वैशाली तायडे, वनिता गवळे, रामदास पाटील, माजी सभापती विलास धायडे, राजेंद्र माळी, दशरथ कांडेलकर, सुधाकर पाटील, विकास पाटील, प्रदिप साळुंखे, माणिक पाटील, सुनिल पाटील, रामभाऊ पाटील, भाऊराव पाटील, प्रशांत भालशंकर,विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे,सुनिल काटे ,कैलास चौधरी,भरत पाटील, शे जाफर, गोपाळ गंगतिरेप्रविण पाटील, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, विजय चौधरी, प्रदिप बडगुजर, बबलू सापधरे,आदी पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती

Protected Content