शिवसेनेच्या विरोधात बंद पुकारणारे आता कुठं गेलेत? : संजय राऊत

Modi Sanjay Raut

 

मुंबई (वृत्तसंस्था) पंतप्रधान मोदींची पुन्हा छत्रपती शिवाजी पुन्हा तुलना करण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजासंदर्भात शिवसेनेवर ज्यांनी तावातावाने टीका केली. ते यावर काय भूमिका घेणार याची मी वाट बघतोय, अशा शब्दात राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्यावर टीका केली.

 

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या सिनेमातील दृष्यांना मॉर्फिंग करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यावर अमित शहा यांचा चेहरा लावून एक चित्रफित टाकण्यात आल्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.

 

राजकारणासाठी शिवरायांचा वापर करणे चूक आहे. छत्रपती शिवाजी महाराज युगपुरूष आहेत. शिवरायांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा व्हिडीओ मी संभाजी भिडेंपासून अनेकांना पाठवला आहे. शिवाजी महाराजाविषयी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर ज्यांनी तावातावाने टीका केली. त्यांच्या प्रतिक्रियेची मी वाट पाहतोय. शिवसेनेच्या विरोधात सातारा, सांगलीत बंद करणारे आता काय भूमिका घेतात, ते मला बघायचे आहे, असे संजय राऊत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले.

Protected Content