कोरोना : पंढरपूर उद्यापासून तीन लॉकडाऊन

पंढरपूर वृत्तसंस्था । राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दुर होण्यासाठी व करोनाची साखळी तोडण्यासाठी पंढरपूर शहरात ३ दिवस बंदचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवार २२, गुरवार २३ आणि शुक्रवार २४ एप्रिल या दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना नागेश भोसले यांनी केले आहे.

 

चिंताजनक : राज्यात ४७२ नव्या रुग्णांची भर; पुन्हा ९ जणांचा मृत्यू

जगभरासह देशात करोना विषाणूने थैमान घातले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोलापूर शहरात करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या नगराध्यक्षांनी आवाहन केले आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २२,२३ व २४ एप्रिल हे तीन दिवस पंढरपूर शहरातील सर्व दुकाने (मेडिकल व हॉस्पिटल सोडून) बंद राहतील. या तीन दिवसांत अत्यावश्यक सेवेतील दुध विक्री सेवा सकाळी ७ ते ९ या वेळेतच सुरु राहतील. मेडिकल व हॉस्पिटल सोडून इतर सर्व दुकाने, फळे व भाजीपाला विक्री देखील या दिवशी बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

खनिज तेलाची ऐतिहासिक घसरण; कच्च्या तेलाचे भाव शून्याखाली

तरी पंढरपूर शहरातील सर्व व्यावसायिकांनी करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपली दुकाने बंद ठेवावीत व हे तीन दिवस कोणत्याही नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन नगराध्यक्षा साधना नागेश भोसले व मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव, गटनेते गुरुदास अभ्यंकर, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, सर्व सभापती नगरसेवक व नगरसेविका यांनी केले आहे.

मुंबईत लॉकडाउन संपेपर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंद राहणार !

Protected Content