खनिज तेलाची ऐतिहासिक घसरण; कच्च्या तेलाचे भाव शून्याखाली

टेक्सास वृत्तसंस्था । करोना विषाणूने आतापर्यंत दीड लाख नागरिकांचा बळी घेतला असून आता त्यात आता अर्थव्यवस्था होरपळू लागली आहे. कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव इतिहासात पहिल्यांदाच शून्याखाली गेला आहे. अचानक तेलाचा भाव शून्यखाली कोसळल्याने अमेरिका, रशियासह आखाती देशांमधील खनिज तेल उत्पादक देशांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यापूर्वी दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ मध्ये खनिज तेलाच्या भावात इतकी मोठी घसरण झाली होती.

मंगळवारी वेस्ट टेक्सास क्रूडचा भाव मंगळवारी उणे ३७.६३ डॉलर प्रती बॅरल इतका खाली कोसळला. याचा अर्थ खनिज तेलाची साठवणूक करणे जिकरीचे बनल्याने विक्रेत्यांनी खरेदीदारांना प्रती बॅरल ३७.६३ डॉलर दिले. करोना रोखण्यासाठी जवळपास निम्मे देशांत अघोषित टाळेबंदी आहे. अशा स्थितीत वाहतूक व्यवस्था, उद्योग धंदे ठप्प आहेत. परिणामी खनिज तेलाच्या मागणीत प्रचंड घट झाली आहे.

 

पालघरप्रकरण सीबीआयकडे सोपवा- संत समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

दरम्यान तेलाच्या किमतींनी प्रत्यक्षात तळ गाठल्याने खनिज तेल उत्पादक देशांची अक्षरश: गाळण उडाली आहे. तेलाच्या किमती शून्याखाली कशा गेल्या याबाबत तेल उत्पादक देशांची संघटना ओपेककडून माहिती घेण्यात येणार आहे. अमेरिकी बाजारपेठे खनिज तेलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. त्यामुळे तेलाची साठवण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

केंद्राच्या सुचना पाळण्याची खबरदारी घेतली तर करोनावर आपण मात करू : शरद पवार

सोमवारी, ब्रेंट क्रूडचा भाव १.६२ डॉलरने कमी होऊन तो २६.४६ डॉलर प्रती बॅरल झाला. तर मे महिन्यातील खनिज तेलाचे कॉन्ट्रॅक्ट ६.२२ डॉलरने घसरून ते १२.०५ डॉलर प्रती बॅरलपर्यंत खाली आले आहेत. दिवसभरात तेलाचा भाव ११.०४ डॉलर प्रती बॅरल इतका खाली घसरला होता. जाणकारांच्या मते गुंतवणूकदारांनी खनिज तेलाच्या कॉन्ट्रॅक्टची विक्री करून पैसे काढून घेतले आहेत.

Protected Content