शिर्डीकरांच्या बेमुदत संपास प्रारंभ

saibaba murti

शिर्डी प्रतिनिधी । साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादाच्या निषेधार्थ शनिवारी मध्यरात्रीपासून शिर्डी येथे बेमुदत संप सुरू करण्यात आला असून बंद काळात मंदिर मात्र उघडे राहणार आहे.

कोट्यवधी देशी-विदेशी भाविकांचे श्रध्दास्थान असणार्‍या साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद गत काही दिवसांपासून उफाळून आला आहे. साईबाबांचा जन्म पाथरी येथे झाल्याचा दावा करण्यात आला असून यासाठी काही पुरावेदेखील सादर करण्यात आले आहेत. तर शिर्डीकरांनी मात्र हे पुरावे फेटाळून लावण्यात आले आहेत. पाथरी येथील नागरिकांनी मुद्दाम हा वाद उकरून काढल्याचा त्यांचा आरोप आहे. या पार्श्‍वभूमिवर काल शिर्डी येथे झालेल्या नागरिकांच्या सभेत मध्यरात्रीपासून शिर्डी बंद पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने मध्यरात्रीपासून बंद सुरू झाला आहे. बंदच्या दरम्यान शिर्डीतील सर्व दुकाने आणि अन्य सेवा बंद राहणार असून मंदिर मात्र उघडे राहणार आहेत.

Protected Content