हार्दीक पटेल यांना अटक

hardik patel news 1553855400

अहमदाबाद वृत्तसंस्था । पाटीदार आंदोलनाचे नेते हादीर्र्क पटेल यांना खटल्याच्या दरम्यान सतत अनुपस्थित राहिल्याने रात्री अटक करण्यात आली आहे.

गुजरातमधील पाटीदार आंदोलनाचा चेहरा असणारे काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांना २०१५ च्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांना अहमदाबाद नजीक असणार्‍या विरमगाव येथून अटक करण्यात आली. अहमदाबादच्या एका न्यायालयाने हार्दिक पटेल यांच्याविरोधात शनिवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. सुनावणी दरम्यान हार्दिक पटेल सातत्याने अनुपस्थित राहिल्यामुळे त्यांच्या विरूध्द अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. या अनुषगाने त्यांना रात्री अटक करण्यात आली आहे.

Protected Content