युपीमध्ये पुन्हा येणार भाजप सरकार : एक्झीट पोलचा निष्कर्ष

नवी दिल्ली-वृत्तसेवा | आज सायंकाळी आलेल्या एक्झीट पोलच्या निष्कर्षानुसार उत्तर प्रदेशात भाजपचे संख्याबळ घटणार असले तरी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार असल्याचे दर्शविण्यात आले आहे.

उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मतदान संपले आहे. रिपब्लिक टीव्ही आणि न्यूज१८ ओपिनियन पोलने उत्तर प्रदेशात भाजपा सरकारचा अंदाज वर्तवला आहे. एबीपी न्यूजने सी व्होटरसह सर्वेक्षण केले आहे, आज तकने अॅक्सिस माय इंडिया सोबत एक्झिट पोल केला आहे.

रिपब्लिक पी मार्क एक्झिट पोलनुसार भाजपाला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये बहुमत मिळू शकते. भाजपला २४० जागा मिळण्याची शक्यता आहे. सपाला १४० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला पुन्हा एकदा १४ जागांवर समाधान मानावे लागू शकते. न्यूज१८ पोल स्ट्रॅटनुसार भाजपाला २११ ते २२५ जागा मिळू शकतात. सपाला १४६ ते १६० जागा मिळण्याचा अंदाज आहे. बसपाला १४ ते २४ जागा मिळू शकतात. टाईम्स नाऊ नवभारत एक्झिट पोलनुसार भाजपाला २२५ जागा मिळू शकतात. सपा आघाडीच्या १५१ जागा कमी होऊ शकतात. बसपाला १४ जागा तर काँग्रेसला फक्त ९ जागा मिळू शकतात.

TV9 भारतवर्ष-पोलेस्टरच्या एक्झिट पोलनुसार, यूपीमध्ये भाजपला 211 ते 225 जागा, सपाला 146 ते 160, बसपाला 14 ते 24, उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 4 ते 6 जागा मिळू शकतात.

Protected Content