सीएए : २४ जानेवारीला मुंबईसह महाराष्ट्र बंद

PrakashAmbedkarLivemint kk5C 621x414@LiveMint

मुंबई प्रतिनिधी । नागरिकत्व कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे येत्या दि.२४ जानेवारी रोजी मुंबईसह महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. दादर येथील आंबेडकर भवनात आज वंचित बहुजन आघाडीची बैठक घेण्यात आली असून या बैठकीनंतर आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत घेत बंदची घोषणा केली आहे.

देशात एनआरसी आणि सीएए विरोधात प्रचंड रोष आहे. सरकार दडपशाही करून हा कायदा लागू करू पाहत आहे. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था तळाला गेली आहे. जीएसटी, नोटबंदी आणि गैर विश्वासाचे वातावरण यामुळे सरकारला निधी येत नाही. देशाची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू आहे. या सर्वाला सरकार जबाबदार असून त्याचा निषेध करण्यासाठीच महाराष्ट्र बंद पुकारण्यात येत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले. या बंदमध्ये मुंबईसह महाराष्ट्रातील संस्था, संघटना, राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या बैठकीला अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या सर्वांनी बंदच्या निर्णयाला पाठिंबा दर्शविला. सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी हा बंद असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Protected Content