पारोळा येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा

parola 1

पारोळा, प्रतिनिधी | येथील संकल्प फाउंडेशन व नेहरू युवा केंद्र जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात आज (दि.१८) स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.

 

दरवर्षी युवा चेतना अभियान अंतर्गत युवक युवती साठी या स्पर्धा भरवण्यात येतात. इ. पाचवी ते सातवीच्या पहिल्या गटात ‘स्वामी विवेकानंद यांचे जीवन कार्य’ व आठवी पुढील दुसऱ्या गटात ‘मला समजलेले स्वामी विवेकानंद’ या विषयावर विद्यार्थ्यांनी आपापली मते मांडली.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वामी समर्थ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. व्यासपीठावर संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. सुभाष आढाव, सचिव मनोज आढाव, पत्रकार अभय पाटील, सामाजिक कार्यकर्ते निजाम मुजावर, आर.एम. पाटील होते. अध्यक्षस्थान मुख्याध्यापक टोळकर यांनी भूषविले. अतिथी सत्कार झाल्यावर दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी आपापली मते मांडली. पत्रकार अभय पाटील, संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा सुभाष आढाव व अध्यक्ष मुख्यध्यापक टोळकर यांनी मार्गदर्शन केले.

या स्पर्धेत प्रथम गटात पूजा संतोष पाटील प्रथम, प्राची मोतीलाल पाटील द्वितीय, प्रियंका प्रदीप पाटील तृतीय, दुसऱ्या गटात शुभांगी भगवान पाटील प्रथम, दिनेश संजय शिंपी द्वितीय, हितेश दिलीप पाटील तृतीय यांनी बक्षीसे मिळवली. या विद्यार्थ्यांना ट्रॉफी, वही, पेन व प्रमाणपत्रांचे वितरण मान्यवरांनी केले. सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. परीक्षक म्हणून किरणकुमार बंडू पाटील व मनोहर हिरालाल पाटील यांनी केले, सूत्र संचालन इ १० वी ची विद्यार्थ्यांनी ज्ञानेश्वरी गुलाब पाटील हिने केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकल्प फाउंडेशनचे सदस्य व स्वामी समर्थ विद्यालयाच्या शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले.

Protected Content